राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेत चंद्रपूरच्या प्रलय म्हशाखेत्री याचे सुयश…

1263

चंद्रपूर: वेध संविधानिक नीतिमत्ता निर्माणाचा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपूर चा प्रलय म्हशाखेत्रीने सुयश मिळविले आहे. जातनिहाय जनगणनेने जातीभेद मिटणार, या विषयांवर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा आज निकाल लागला असून यांत प्रलयने द्वितीय क्रमांक पटकावला.

गेल्या सात-आठ महिन्यापासून जगात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेक महापुरुषांच्या जयंती,उत्सव कार्यक्रम अनेक सामाजिक संघटनेने ऑनलाइन स्वरूपात घेऊन महापुरुषांना अभिवादन करीत आहेत.

अश्यातच वेध संविधानिक नीतिमत्ता निर्माणाचा यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकांनी आपले मत व्यक्त करून व्हिडीओ आयोजकांकडे पाठविले होते. यात प्रलयने द्वितीय क्रमांक मिळविला.

प्रलय हा मूळचा चंद्रपूर तालुक्यातील सीनाळा या गावाचा असून सध्या चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. सोबतच प्रलय हा एक उत्तम वक्ता आहे. अनेक ठिकाणी प्रलयची व्याखाने झाली आहेत.

या पूर्वी प्रलय गोंडवाना विद्यापीठ स्तरीय इंद्रधनुष्य 2019 च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता व त्याने राज्यस्तरावर गोंडवाना विद्यापीठाचं नेतृत्व केलं होतं. परंतु राज्यस्तरीय स्पर्धेत त्याला यश मिळालं नाही म्हणून तो निराश होता पण त्याने मनी एक ध्यास केला की कधी न कधी मी राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळविणारच आणि त्याने स्वतःच स्वप्न या कोरोनाच्या च्या भयानक वास्तवात पूर्ण केलं.त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.प्रलयने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा, शिक्षक, मित्रमंडळ आणि मार्गदर्शकांना दिले आहे…