Homeआरोग्यकोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड

कोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड

चंद्रपुर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर चा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिल्या आहेत.

आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-19 आजाराची अँटीजन टेस्टींग करीता अँटीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर असे एकुण 27 ठिकाणी निशुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे.

या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात एकुण 17 खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर कार्यरत असून त्यांचेकरिता शासनाने अँटीजन टेस्टींग शुल्क जास्तीत जास्त रू. 800 ठरवून दिलेला आहे. यापेक्षा जास्त शुल्क कोणत्याही खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर च्या व्यावसायीकांना आकारता येत नाही. कोणत्याही सेंटर ने रू. 800 पेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास या बाबतची माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र . 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.

खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सद्रुष लक्षणे असल्यास व अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर.टी.पी.सी.आर. करीता पाठविणे आनिवार्य असल्यामुळे खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर असे नमुने शासकीय व्ही.डी.आर.एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय, चंद्रपूर येथे पाठवितात. या नमुन्यांकरीता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर हे आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करीतादेखील परस्पर अँटीजन टेस्टींग चे सेवाशुल्क रू. 800 घेतल्यावर सुध्दा अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहे व ही बाब अत्यंत खेदाची आहे.

अशा प्रकारच्या घटना नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र . 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधून तत्कार नोंदवावी. सद्या जिल्ह्यात संस्था डॉ. अतुल चिद्दरवार पॅथेलॉजी लॅब व डॉ. संगई पॅथेलॉजी लॅब या दोन खाजगी संस्थेना आर.टी.पी.सी.आर. स्वॉब कलेक्शन सेंटर साठी जिल्हा स्तरावरून परवानगी देण्यात आलेली आहे व अशा संस्थेला सुध्दा रू. 1800 पेक्षा जास्त सेवा शुल्क आकारता येत नसल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!