पदवीधरांची ही निवडणूक महाराष्ट्रातील आघाडी सरकार विरूद्ध भाजप अशी आहे-माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

632

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी -नितेश खडसे.

सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका या महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अशी सरळ लढाई असुन सरकारच्या 11महिण्याच्या काळातील अपयश जनतेपूढे मांडण्याची भाजपला संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सरकार हे विदर्भ विरोधी असून कोरोना सारख्या संकट काळातही विदर्भात साधे फिरकुनही पाहिले नाही, येथील विदर्भ वैधानिक मंडळ संपुष्टात आणले, विदर्भातील विकास कामांना जाणीवपूर्वक स्थगिती दिली , नागपूरचे अधिवेशन मुंबईला नेले, केवळ मुंबई-पुणे येथे बसून काम करणारे हे सरकार असून १ डिसेंबरला होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत विदर्भातील पदवीधर मतदारानी भाजपाचे उमेदवार संजय जोशी यांना मतदान करून या सरकारला धडा शिकवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना केले.
पत्रकार परिषदेला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, प्रदेश महामंत्री शिवानीताई दानी, गडचिरोली चे आमदार डॉक्टर देवराव होळी, भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, महामंत्री रवींद्र ओल्लारवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश  बाबुराव कोहळे, महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, अनुसूचित जमातीचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, नगराध्यक्षा योगिता पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते