चंद्रपूर; गेल्या २४ तासात २११ जणांनी केली कोरोनावर मात…तर नव्याने २२६ कोरोना पॉझिटिव्ह

0
138

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात २२६ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे तर २११ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १९ हजार २०३ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार १२१ झाली आहे. सध्या एक हजार ७९५ बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४४ हजार ९२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख २१ हजार ६१० नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६७, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here