Home गडचिरोली ३० शेतकरी अजूनही कर्जमुक्तीपासून वंचित

३० शेतकरी अजूनही कर्जमुक्तीपासून वंचित

473

नवीन कर्जासाठी अपात्र शेतकरी आर्थिक अडचणीत

गडचिरोली प्रतिनिधी/नेमाजी घोगरे

येथील वैनगंगा कोकण ग्रामीण बैंक तर्फे परिसरातील शेतकऱ्यांना मागील वर्षी 179 शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले होते .त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासन ,या योजनेमार्फत कर्जमुक्ती मिळत आहे .त्यासाठी १७९ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कर्जमाफीसाठी शासनाकडे पाठविले त्यापैकी १४९ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले .व ३० शेतकरी अजूनही कर्जमुक्ती पासून वंचित राहले आहे .त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहे . यासर्व ३० शेतकऱ्यांनी जि. प.सदस्य रुपाली पंदिलवार यांचेकडे येऊन आपली समस्या सांगितली व निवेदन दिले . या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी व सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे सर्व ३० शेतकरी नवीन कर्जासाठी अपात्र ठरले आहे त्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही. पर्याय नसल्याने या शेतकऱ्यांनी बचतगटाकडून कर्ज घेतले आहे .त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी अशी मागणी जि.प.सदस्य रुपाली पंदिलवार यांनी केलेली आहे .

Don`t copy text!