गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी – नितेश खडसे
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करुन, ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत करावे, या मागण्यांसाठी आज ओबीसी समाजबांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तसेच आमदार आणि खासदारांच्या कार्यालयापुढे थाळी वाजवा आंदोलन केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव देवानंद कामडी, नगरसेवक रमेश भुरसे, सुरेश भांडेकर, विनायक झरकर, विलास पारखी, जनार्धन ताकसांडे, रामकृष्ण ताजणे, दत्तात्रय खरवडे, नगरसेवक सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.






