गांधी सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
178

भंगाराम तळोधी येथील ज्ञान शाळेचा उपक्रम

भंगाराम तळोधी / राजेंद्र झाडे

सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर अंतर्गत गेल्या 30 वर्षापासून महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्ताह संपन्न करीत आहे. त्याअंतर्गत प्रभात फेरी, जनजागृती दिंडी ,आरोग्यविषयक कार्यक्रम ,रक्तदान शिबिर, कायदेविषयक मार्गदर्शन ,कृषी विषयक मार्गदर्शन ,इत्यादी कार्यक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी व्हायचे परंतु covid-19 मुळे शाळा महाविद्यालय बंद असल्या कारणाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल साकूरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली महाविद्यालयाचे फेसबुक पेज ओपन करून फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सतत आठ दिवस विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा महाविद्यालयाकडून आव्हान करण्यात आले .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वास्तव्याच्या ठिकाणी राहून आपल्या गावांमध्ये लोकसहभागातून आपल्या परीने जसे जमेल तसे कार्यक्रम करावे. व covid-19 सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पडावे.
त्या आव्हानाला स्वीकारून महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व BSW च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी श्री .अनिकेत दुर्गे या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम आपल्या भंगाराम तळोधी गावांमध्ये घेतले. या गावामध्ये लॉकडाउन ज्ञानशाळा बुद्ध विहारांमध्ये सुरू करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित केले व शाळा बंद असल्यामुळे पर्याय उपलब्ध करून दिला .विद्यार्थ्यासाठी महात्मा गांधी जयंती सप्ताह निमित्त निबंध स्पर्धा, एक विद्यार्थी – एक झाड उपक्रम, देशभक्ती गीतगायन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, वकृत्व स्पर्धा( मी महात्मा गांधी बोलतोय)मैदानी स्पर्धा, ग्रामस्वच्छता अभियान, या निमित्त कार्यक्रम सप्ताहामध्ये श्री अनिकेत या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ठेवली होती. या स्पर्धा मध्ये क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस लोकसहभागातून त्यांनी मिळवून दिले.
त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील साकूरे यांनी या कार्यासाठी व उत्कृष्ट विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुद्धा श्री अनिकेत दुर्गे त्याच्या पालक कुटुंबातील सदस्य,गावातील ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here