आष्टी प्रतिनिधी/बंटी गेडाम
चामोर्शी तालुक्यातील आष्टी या गावात गेल्या दोन दिवसांपासून वाघ वारंवार शिरकाव करीत आहे.
आष्टी शहरालगत चपराळा अभयारण्य आहे.दोन दिवसांपूर्वी इथे एक बिबट्या आणि दोन वाघ सोडण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच आष्टी येथील चामोर्शी रोड वरील सद्गुरु महाविद्यालयाजवळ मागील दोन दिवसांपासून वाघ दिसून आले.व तसेच वाघाने दोन मेंढ्या ठार केल्या आणि चंदनखेडी येथेसुद्धा वाघ फिरत आहे असे तेथील नागरिकांनी सांगितले आहे त्यामुळे आष्टी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि आष्टी शहरालगत वाघ फिरत आहे अशी चर्चा ही सुरू आहे हे वाघ ताडोबा अभयारण्यातील आहेत ही माहिती मिळाली असून ताडोबा अभयारण्यात वाघाची संख्या जास्त झाल्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहे.
आणि तेथील वाघ हे चपराडा अभिअरण्यात सोडले आहेत.