जिवतीत एका फोन वर दारू उपलब्ध ? प्रशासन घेते झोपेचे सोंग 

0
258

दिपक साबने – जिवती

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी होऊन पाच वर्षे होत आहेत. परंतु जिवती शहरात ठिकठिकाणी ” एका फोन वर दारू आली असे चित्र आहे ” शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे. जिवतीला तेलंगणा राज्याची सिमा लागून असल्यामुळे तिकडून शहरात दारू येत असेल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. तरी मात्र प्रशासनाकडून झोपेचे सोंग घेतल्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र परिसरात आहे. प्रशासन मात्र गावाबाहेर होणाऱ्या दारू तस्करीवर थातुरमातुर कारवाई करून आपण केलेली कारवाई योग्य असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्याना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मद्यपी आपली हौस भागवण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेत आहेत. अश्यातच दारू विक्रेता दुप्पट नफा कमावित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून शहरात चलते – फिरते लायसन्स असलेले बार कधी बंद होणार आहेत. शहरातील सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here