गडचीरोली जिल्हयात 4 मृत्यूंसह नवीन 95 कोरोना बाधित

0
216

आज 61 जण कोरानामुक्त

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

आज जिल्हयात 4 कोरोनामुळे मृत्यूंची नोंद झाली. तसेच नवीन 95 जण कोरोना बाधित आढळले. एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 61 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 642 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2514 रूग्णांपैकी 1852 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

*कोरोनामुळे 4 मृत्यू* : यामध्ये चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चेक येथील 70 वर्षीय वृद्धाचा कोरोनामूळे मृत्यू झाला. ते हायपरटेन्शन ग्रस्त होते. गडचिरोली हनुमान वार्ड मधील 63 वर्षीय महिला, आरमोरीमधील दोन यात इंजेवारी मधील 50 वर्षीय किडनी विकाराने ग्रस्त व्यक्ती तसेच आरमोरी बर्डी मधील 53 वर्षीय पुरूष सारी रूग्ण कोविड रूग्णालयात भरती होता. अशाप्रकारे आज 4 मृत्यूंची नोंद झाली.

*नवीन 95 बाधित* : यामध्ये गडचिरोली 28, अहेरी 17, सिरोंचा 11, आरमोरी 7, चामोर्शी 5, कोरची 15, कुरखेडा 1, भामरागड 1, धानोरा 2, एटापल्ली 1 व वडसा 6 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली मधील पोलीस मुख्यालय 1, रामनगर 1, साईनगर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, सीआरपीएफ 2, वनश्री कॉलनी 1, पोलीस कॉलनी 1, कॅम्प एरिया 1, ग्रामसेवक कॉलनी 1, शेडमाके वार्ड 1, गोकूळवार्ड 1, ब्रहमपुरीचा 1 जण, कन्नमवार वार्ड 1, विवेकानंद 1, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, सदगुरू नगर 1, नवेगाव 4, पोलीस संकुल 1, सर्वोदया वार्ड 2, मोरेश्वर पेट्रोल पंपासमोर 1, गोंडपिंपरी वरून आलेला 1 व लांजेडा 2 यांचा समावेश आहे. एटापल्ली 1 शहरात आढळला. आरमोरी शहर 7 रूग्ण. कोरची शहर 2, सी-60 जवान 13. अहेरी यामध्ये शहर 8, रायपूर 1, जिमलगट्टा 1, महागाव 1, कमलापूर 1 यांचा समावेश आहे. वडसामध्ये माता मंदिर 1, सावंगी 2, कुरूड 1, बनसोड रूग्णालय कर्मचारी 1, कस्तूरबा वार्ड 1 यांचा समावेश आहे. धारोना मध्ये मीचगाव 2 जण बाधित. सिरोंचा शहरात 11 जण बाधित. कुरखेडा कढोली 1, शहर 1 जण बाधित. भामरागड शहर 1 जण बाधित. चामोर्शीमध्ये मुरखाळा माल 1, शहर 2, येनापूर 2 जणांचा समावेश आहे.

*आज 61 जण कोरोनामुक्त* : यामध्ये गडचिरोलीमधील 31 जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात आरमोरी 5, कोरची 1, चामोर्शी 7, सिरोंचा 7 व वडसा 10 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here