गडचिरोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्याची दुरव्यवस्था ; स्थानिक नागरिकांना रस्त्याने जाताना जीव हातात घेऊन करावे लागत आहे प्रवास

430

गडचीरोली

गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्ते खोदून गटार कामा साठी जागोजागी अर्धवट काम करून ठेवलेले आहेत त्यामुळे पाऊस आला की पूर्णता रस्ते चिखलमय झालेले दिसतात, चिखल तुडवत विद्यार्थांना व स्थानिक नागरिकांना जावे लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा मुलामा देण्याची कार्य पण केले, मात्र मुरुमामुळे रस्ता पावसात आणखी चिखलमय होत आहे, स्थानिक रेड्डी गोडउन चौक, लांजेडा येथील सरकारी मुलींचा वसतिगृह, विवेकंदनांगर इत्यादी परिसरातील जागोजागी गटार चे चेंबर्स रस्त्याच्या मधोमध उभे असल्यामुळे तसेच काही ठिकाणी रास्तावर गिट्टी टाकून ठेवलेली आहे, दुचाकी वाहनधारकांना श्वासाचा, कमरदुखीचा, मानेचे त्रास सारखे त्रास सहन करावा लागत आहे, खोदून ठेवलेल्या रस्त्याला कुठलेही caution बोर्ड, वॉर्निंग टेप सारखे दर्शक लावलेले दिसत नाही त्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात होण्याच्या दाट शक्यता आहे ,मात्र या सर्व बाबींकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, सर्वत्र नागरिकांमध्ये शहरामधील या गटार लाईन च्या अर्धवट कामा करिता असंतोष आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास रस्ते बांधकामांसाठी व सुधारीकरणासाठी सर्वाधिक निधी मिळतो. दरवर्षी रस्त्यांचे बांधकाम व डागडुजी होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने अल्पावधीतच रस्ते उखडून जातात त्यात अनेकदा किरकोळ तसेच मोठे अपघात घडत असताना दिसून येतात. शहरातील चंद्रपूर रोड, चामोर्शी रोड, धानोरा रोड मार्गावर नवीन काम चालू आहेत पण वर्ष उलटून गेले तरीही काम पूर्ण झालेली नाही, तसेच बऱ्याच ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम दिसून येत आहेत. त्यामुळे जड व चारचाकी वाहनधारकांना तसेच दुचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः लक्ष देऊन उत्कृष्ठ दर्जाचे काम कंत्राटदाराकडून करून घ्यावे. नगरपालिका प्रशासनाने वेळीच रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करून रस्त्यांवर खड्डे पडणार नाही व नागरिकांना दळणवळणचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.