Home गडचिरोली ठाकरे सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली: तातडीच्या आर्थिक मदतीत केवळ ४६...

ठाकरे सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली: तातडीच्या आर्थिक मदतीत केवळ ४६ लक्ष रुपये-आमदार डॉ देवरावजी होळी

543

 

जिल्हा प्रतिनिधी/ नितेश खडसे
गडचिरोली:
जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अत्यंत तोकडी मदत जाहीर केल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये असंतोष
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज , आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी इत्यादी तालुका मध्ये महापूरामुळे शेतीचे घरांचे,अन्नधान्याचे जनावरांसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले मात्र ठाकरे सरकारने पूरग्रस्तांसाठी ४६ लक्ष रुपयांची अत्यंत तोकडी मदत जाहीर करून गडचिरोली जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केला आहे

गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे महापुराची परिस्थिती निर्माण होवून हजारों हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले, असंख्य घरे जमीनदोस्त झाली, जनावरे वाहून गेली,अन्नधान्य-भांडीकुंडी वाहून गेली, शेतीच्या मशागतीची अवजारे नष्ट झाली , शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले या सर्वांना व शेकडो गरिबांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज असताना केवळ १० झोपड्या व घरांचे नुकसान झाले म्हणून व २९ लोकांचे नुकसान झाले असे दाखवून केवळ ४६ लक्ष रुपयांची तोकडी मदत जाहीर करण्यात आली . ही मदत म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ,गरिबांची थट्टा असून तातडीने या मदतीत वाढ करावी अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली आहे

Don`t copy text!