कोरची तालुका प्रतिनिधी / रमेश कोरचा
Advertisements
गडचिरोली: रायपूर-बल्लारशा-हैदराबाद महामार्ग कुरखेडा-कोरची या तालुक्यांतून गेलेला मार्ग आहे २४ तास या मार्गावर रहादारी सुरू रहाते. या महामार्गातून अनेक जड वाहनांची वाहतूक होत वाहतूक असल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे. जड वाहनाच्या वाहतुकीच्या मानाने महामार्गाचा मजबुतीकरण केले जात नाही. म्हणून या महमार्गावर नेहमीच खड्डे पडलेल्या असतात.या खड्डयांमुळे नेहमीच अपघात होऊन लोकांचे प्राणही जात आहेत. सध्या देखील या महमार्गावर जागोजागी अनेक खड्डे पडलेल्या आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या विभागातील अधिकाऱ्यांवर मनुष्यबाधाचा गुन्हयाखाली कठोर कारवाई करावी अशी मांगणी कोरची परीसरातील नागरिकांन कडून केली जात आहे.
Advertisements
Advertisements