मूकबधिर युवकांवर अनैसर्गिक कृत्य

0
293

आरोपी निघाला करोना बाधित

Advertisements

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

Advertisements

बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाल वार्ड टेकडी परिसरातील गौशाळेत काम करणाऱ्या 26 वर्षीय मूकबधिर युवकावर एकाने 31 ऑगस्ट रोजी रात्री त्या मुकबधिरावर जबरदस्ती करीत अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यान आरोपीची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असता तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. आरोपीस जमानतीवर सोडून इंस्टिट्यूशनल क्वॉरंटाईन केंद्रात उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. 31 ऑगस्ट रोजी रात्री पीडित मूकबधीर हा गोशाळेत झोपला होता. आरोपीने त्याचा गळा आवळून कपडे काढले आणि अनैसर्गिक कृत्य केले.
सकाळी जेव्हा ही बाब पीडित युवकाने हातवारे करीत आपल्या मालकाला सांगितली त्यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.पीडित युवकाने आरोपीला ओळ्खल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने व जिल्हा कारागृहातील कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने सर्वांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपीची सुद्धा चाचणी करण्यात आली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. चाचणी अहवाल पोलिसांना माहीत पडल्यावर पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली.आरोपीला तात्काळ संस्थात्मक विलीगिकरण केंद्रात पाठविण्यात आले असून संपर्कात आलेल्या पोलिसांनी स्वतःला गृह अलगीकरणात ठेवले आहे.पुढिल तपास पोलिस स्टेशन बल्लारपूर करीत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here