पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करून अभिवादन करण्यात आले.
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बार्टी, पुणे येथे त्यांच्या प्रतिमेस श्रीमती स्नेहल भोसले विभागप्रमुख, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, श्रीमती वॄषाली शिंदे, विभागप्रमुख, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रामदास लोखंडे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे, डॉ. अंकुश गायकवाड, प्रा. अमृता घोणे, यांनी रमाईच्या संघर्षमय त्यागाला अभिवादन केले. श्रीमती जागृती गायकवाड, श्रीमती गौरी सोनवणे यांनी रमाईचे गित सादर केले. राजेन्द्र बरकडे लेखाधिकारी, डॉ. प्रियदर्शनी तेलंग, हंबिरराव कांबळे, कार्यालय अधीक्षक श्रीमती डॉ. संध्या नारखडे, रितेश गोंडाणे, प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती शुभांगी सुतार, महेश गवई, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती नसरिम तांबोळी, विशाल शेवाळे, रविकुमार आराक आदी व बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज पुणे येथील रमाईच्या पुतळ्यास श्रीमती स्नेहल भोसले, श्रीमती इंदिरा अस्वार, श्रीमती वृषाली शिंदे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रामदास लोखंडे, श्रीमती सुनंदा गायकवाड, डॉ. अंकुश गायकवाड, संजिव कटके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन श्रीमती सुनंदाताई गायकवाड, प्रकल्प अधिकारी यांनी केले. आभार रामदास लोखंडे यांनी मानले.