वनंद येथिल स्मारकास बार्टी संस्थेच्या वतीने अभिवादन.

740

दापोली, वनंद या रमाईच्या जन्म गावी बार्टी संस्थेतर्फे माता रमाई यांच्या स्मारक स्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बार्टीतर्फे मूल्यवान पुस्तकांचे अल्प दरात विक्री करणाऱ्या पुस्तक स्टॉलचे उद्घाटन यादव गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रत्नागिरी, यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांचे स्वागत सुभेदार सचिन जगदाळे, कार्यालय अधीक्षक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर यांनी बार्टी बुक स्टॉल व भोजन स्टाॅलला भेट देऊन बार्टीच्या समाज उपयोगी स्तुत उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. जागर समतेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

सुभेदार सचिन जगदाळे कार्यालय अधीक्षक, डॉ. प्रेम हनवते, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकाश जमदाडे, व्यवस्थापक राष्ट्रीय स्मारक महाड, सचिन नांदेडकर, प्रकल्प अधिकारी, आशिष कांबळे, अतिरिक्त प्रकल्प अधिकारी रत्नागिरी, माहेश्वरी विचारे, समतादुत दापोली, राहुल कवडे, फोटोग्राफर, आदी उपस्थित होते.