Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एम. आय. डी. सी. मध्ये अधिकाधिक नवीन इच्छुक उद्योजकांना भूखंड...

गडचिरोली जिल्ह्यातील एम. आय. डी. सी. मध्ये अधिकाधिक नवीन इच्छुक उद्योजकांना भूखंड वाटप करा -आमदार डॉ देवरावजी होळी

295

गडचिरोली: जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली जास्तीत जास्त जागा गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुक नवउद्योजकांना वाटप करण्यात यावी तसेच एमआयडीसी परिसर विकसित करण्यात यावा या संदर्भात आपल्या स्तरावर मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाषजी देसाई यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन केली.
गडचिरोली जिल्ह्यात एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. जागा मिळावी याकरिता जिल्ह्यातील इच्छुक नवउद्योजक मागणीही करीत आहेत. परंतु अजूनपर्यंत त्यांना जागेचे वाटप करण्यात आले नाही. तसेच एमआयडिसी परिसरही विकसित करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यात यावा व स्थानिकांना भूखंड वाटप करण्यात यावे या उद्देशाने आपल्या स्तरावर मंत्रालयात मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आमदार सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

Don`t copy text!