Home गडचिरोली वनविभागाने तालुक्यातील जनतेला जळाऊ लाकूड बीट व बांबू उपलब्ध करून द्यावा- आमदार...

वनविभागाने तालुक्यातील जनतेला जळाऊ लाकूड बीट व बांबू उपलब्ध करून द्यावा- आमदार डॉ देवराव होळी

382

ब्युरोचीफ प्रशांत शाहा
चामोर्शी: तालुक्यातील जनतेला वन विभागा कडून जळाऊ लाकूड बिट ,बांबू ,उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार डॉ होळी यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी निस्तार डेपो येथे जळाऊ लाकूड बिट व बांबू उपलब्ध नसल्याने नागरिकांचे वारंवार तक्रारी येत आहेत , यावेळी आमदार डॉ होळी यांनी आलापल्ली येथील उपवनसंरक्षक यांच्या सोबत भ्रमणध्वनी व सविस्तर चर्चा केली व वन विभागाने येथील नीस्तार डेपोत लवकरात लवकर जळाऊ लाकूड व बांबू उपलब्ध करून न दिल्यास येथील वन विभागाला ताला ठोकण्याचा इशारा दिला
व गडचिरोली विधानसभा मतदार संघात कोणत्याही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला
त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही असे सांगितले ,यावेळी प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख ,भाजप बंगाली आघाडी
जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ शाहा व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते होत

Don`t copy text!