ब्रेकिंग न्यूज! रेल्वेरुळावर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची आत्महत्या…

4670

ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी येथील रेल्वे स्टेशन पासून १०० मीटर अंतरावर एका शिक्षकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मृतक व्यक्ती हे ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्राप्त माहिती नुसार मृतक व्यक्तीचे नाव विलास हरिदास दहीवले वय (४०) वर्ष, शिवम अपार्टमेंट, गणवीर रुग्णालयाजवळ ब्रम्हपुरी असे आहे.

सदर शिक्षक हे आर्थिक व मानसिक रित्या तणावामध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असे बोलण्यात येत आहे. शिक्षकाने रात्री ११ते१२ च्या दरम्यान आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेची माहिती कळताच रात्रौ २ ते २.३० चे दरम्यान ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु सदर घटना रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने सदर प्रेत तिथेच होते.

सकाळी रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. मृतक व्यक्तीच्या परिवारावर शोककळा पसरली असून पूर्ण परिवार दुःखात बुडाला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.