गडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे-आमदार डॉ देवराव होळी

0
456

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपुर येथे ग्रामपंचायत निवडणूक होते त्यामुळे एका उमेदवाराने सायंकाळी सात वाजताच हातभट्टी ची दारू वाटणे सुरू केली ज्यांनी दारूचे सेवन केले त्यांची प्रकृती दुपारपासून बिघडली व प्रकाश फकिरा
गौरकर (53) व रमेश नानाजी डूमणे (52) यांचा मृत्यू झाला
व भगीरथ गोविंदा व्हट्टे (52) बालाजी नारायण डवले (60)शामराव काशिनाथ गौरकर (60) राजेंद्र काशिनाथ गौरकर (40)यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले तसेच बापूजी नांदेकर ( 65) यांच्यावर आष्टी येथे उपचार सुरू आहेत या विषारी प्रकरणी बोलतांना सध्या विधानसभा मतदार संघ कामकाज निमित्त मुंबई येथे असलेले गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी दुःख व्यक्त केले व दूरध्वनी वर बोलतांना सांगितले या विषारी दारू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखाची व प्रकृती गंभीर असलेल्या नागरिकांना एक लाख रुपयाचा आर्थिक मदत तत्काळ करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारला त्यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here