आता हेच बाकी होत! नागपूर मेट्रोत प्री-वेडिंग, वाढदिवस झाले साजरे अन आता जुगारही…

0
241

नागपूर: नागपूर मेट्रो सुरू झाली तेव्हापासून काही ना काही वादात घेरली जात आली आहे. कधी भ्रष्ट्राचाराचे आरोप, तर कधी सुरक्षा रक्षकांचे वेतन देण्यावरून मेट्रोचे वाद पुढे आले आहेत. आता मेट्रो चर्चेत आली आहे ती वेगळ्याच कारणाने. नागपुरातील एका व्यक्तिचा बुधवारी वाढदिवस होता. तो मेट्रोमध्ये साजरा करण्यात आला. पण यावेळी मेट्रोमध्ये काही जण जुगार खेळताना आढळले.

सायंकाळी ६ वाजता बर्डी ते लोकसेवानगर या प्रवासासाठी मेट्रो बुक करण्यात आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा केला जात होता. केक कापला जात होता, गाणे, नाच सुरू होते. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे काही जण जुगार खेळत होते. मेट्रोमध्ये सुरक्षा रक्षक असूनसुद्धा त्यांना कुणीही टोकलं नाही. त्यामुळे मेट्रोमध्ये कुठलाही कार्यक्रम करताना हे सर्व ‘परमीसीबल’आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. एखादा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मेट्रो बुक करायची आणि मग रेल्वेत वाट्टेल ते करायचे, असाच संदेश गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात प्रसारित होतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here