अयोध्या येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी राजे अम्ब्रिशराव महाराजांनी दिली 5 लाखांची देणगी…

616

नितेश खडसे (जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली)

गडचिरोली: जगभरातील करोडो हिंदूंच्या आस्थेचे केंद्र असलेल्या रामजन्मभूमी अयोध्या येते बनणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर बांधकामासाठी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी 5 लाख रुपयांची देणगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह मा. दिपकजी तामशेट्टीवार यांच्याकडे 15 जानेवारी रोजी राजमहाल अहेरी येते सुपूर्द केली आहे. ही देणगी ह्या अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी देणगी मानली जात आहे..
राजे हे आपल्या दानशूर व धार्मिक वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत, नुकतेच त्यांनी अहेरी येतील 100 वर्षं जुन्या एकमेव शिव मंदिराचे जीर्णोद्धार स्वखर्चाने करण्याचे ठरवून, त्याचे भूमिपूजन ही केले होते. आणि आत्ता काही दिवसातच श्रीराम मंदिरासाठी इतकी मोठी देणगी दिल्याने राजेंच्या दानशूर वृत्तीचे जनतेमध्ये मोठी चर्चा आणि कौतुक होत आहे..!!
देणगी देत असतांना संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दिपकजी तामशेट्टीवार, चंद्रपूर विभाग प्रचारक अश्विनजी जयपुरकर,अहेरी जिल्हा कार्यवाह गजाननजी राहुलवार,जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, संतोषजी जोशी, अभयजी भोयर हे उपस्थित होते…..