वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना…

0
860

नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

सरपणासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली तालुकातील दिभना ते कळमतोला या मार्गावरील परिसरात घडलेली आहे, जखमी झालेली महिला सौ सुनंदा वसंत भोयर रा. कळमटोला ( भरटकरटोली) ही चुरचुरा बिट कक्ष क्र १( FDCM) चे जंगलात सरपण आणण्यासाठी गेली असता दुपारी 2 वाजताच्या दरम्यान तिच्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.

तसेच दुसरीकडे धानोरा रोड वरील काकडयेली गावा लगतच्या जंगल परिसरात बिबट्या वाघाने महिला वर हल्ला करून जखमी केल्याचे वृत्त आलेले आहे, सारख्या होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here