Homeकृषीगडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा- आमदार डॉ. देवरावजी होळी

गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा- आमदार डॉ. देवरावजी होळी

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करताना खरेदीची मर्यादा केवळ ९.६ क्विंटल करणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून खरेदी मर्यादा एकरी 20 क्विंटल करण्यासह, अतिक्रमित व वनहक्क धारक शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना निवेदन देऊन केली.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्या घेऊन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोठे आंदोलन करण्यात आले. खरेदी मर्यादा वाढविण्यासह अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना व वनहक्क धारक शेतकऱ्यांना केंद्रावर धान खरेदी सह महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आमदारांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले त्याच मागण्याच्या पूर्ततेसाठी आपण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यां वरील अन्याय दूर करावा अशी विनंती केली असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे कळविले आहे.. त्याचबरोबर शासनाच्या मार्फत धान विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या अत्यंत किचकट असणाऱ्या खरेदी प्रक्रियेला सुलभ करून शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास थांबविण्यात यावा अशीही मागणी यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!