BSNL थ्रीजी सेवा तात्काळ सुरू करा अन्यथा टॉवर वर चढून आंदोलन करणार-भाजपा ब.आ जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा

0
195

जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

Advertisements

गडचिरोली/चामोर्शी
चामोर्शी तालुक्यातील रेगडी या गावात BSNL चा टॉवर आहे. चार ते पाच वर्षे अगोदर हे टॉवर उभारण्यात आले असून मागील वर्षी BSNL ने थ्रीजी सेवा देण्याकरिता मशीने सुद्धा लावलेली आहे. परंतु अजूनही थ्रीजी सेवा कंपनीने सुरू केलेली नाही.नेहमी येथे कव्हरेज चा लपंडाव होत असल्याचे चित्र असून रेगडी,विकापल्ली,माडेआमगाव येथील नागरिकांना याचा भुर्दंड बसत आहे.

Advertisements

परिसरातील नागरिक वारंवार आपल्याकडे तक्रार करत आहेत
तरी संबंधित अधिकारी रेगडी येथील BSNL टॉवरची सेवा थ्रीजी करा. अन्यथा आंदोलन करणार असा इशारा भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ शाहा यांनी केली आहे. या वेळी रेगडी येथील श्री,बाजीराव गावडे,भाऊजी नेवारे,बाजीराव तलांडे,प्रशांत शाहा,उमेश मल्लिक,रमेश दयालवार,गुरुदेव कुळमेथे, व इतर गावकरी उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here