चालत्या कार मध्ये लागली अचानक आग, चार प्रवासी थोडक्यात बचावले

0
399

चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट वरून चंद्रपूरला जात असलेल्या धावत्या कारला अचानक आग लागल्याने त्यातील चार प्रवासी थोडक्यात बचावले. वरोरा शहराजवळील येन्सा गावाजवळ धावत्या कारला आग लागल्याने त्यातील नरेंद्र हाडके , राजू सातपुते, सूर्यकांत कळमकर, पृथ्वीराज मेश्राम व चालक लगेच खाली उतरले.

चालकाने प्रसंगावधान दाखवून कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली. त्यानंतर कार जळून संपूर्णपणे खाक झाली. प्रवाशांनी आपला जीव वाचवत रोडच्या दुसऱ्या बाजूने जात अग्निशमन दलाला फोन लावला. आगीचा बंब पोहोचेपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली. यानंतर वरोरा नगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले.

उर्वरित जळत्या कारला अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी पूर्णपणे विझवले. आगीचे कारण अजून पर्यंत कळू शकले नाही. या घटनेमुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here