शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा-आमदार डॉ देवराव होळी

0
117

नितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात आलेला महापुर, दुष्काळ, अवकाळी पाऊस व पिकांवर आलेल्या किडींच्या दुष्परिणाम मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर फार मोठे संकट कोसळले असून शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक व मानसिक संकटाला सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या मदतीकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्या अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन केली यावेळी माजी आमदार संजयजी पुराम गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षी अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पाऊस नसतानाही आलेला महापूर, अवकाळी आलेला पाऊस,पिकांवर आलेली रोगराई ,दुष्काळ, वादळवारा अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले .त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक संपूर्णतः नष्ट झाली. शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली ,परंतु ती मदत अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही यामुळे असंख्य शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून शेतकरी फार मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्याचे कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांच्याकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here