Homeगडचिरोलीवन हक्क जमीन धारक शेतकऱ्यांना शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान विक्रीस परवानगी;...

वन हक्क जमीन धारक शेतकऱ्यांना शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान विक्रीस परवानगी; आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश.

-नितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

सन 2020- 21 चालू हंगामामध्ये आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन च्या मार्फत विविध धान खरेदी केंद्रावर शासकीय धान खरेदी सुरू झाली. गडचिरोली हा आदिवासी व जंगल व्याप्त जिल्हा असुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन हक्क कायद्यानुसार जमीनीचा पट्टा मिळालेले शेतकरी आहेत. शासनाने धान खरेदी करीता जमिनीचा ७/१२ आवश्यक केलेला आहे. परंतु वन हक्क जमिनीचा आँनलाईन प्रक्रियेत ७/१२ उपलब्ध नसल्याने शासकीय धान खरेदी केंद्रावर वनजमीन धारक शेतकऱ्यांना सातबारा अभावी धान विक्री करण्यास अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी तहसील कार्यालय देसाईगंज येथे संपन्न बैठकीत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली व तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवुन मार्ग काढण्यासाठी सूचना केली होती. तसेच दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथे आयोजित विधानसभा अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगनजी भुजबळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वन हक्क जमीनधारक शेतकऱ्यांची समस्या निदर्शनास आणून दिली त्यावर माननीय मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत जिल्हाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक मार्केटिंग फेडरेशन, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी च्या परिपत्रकानुसार ” वन हक्क अधिनियम 2005 अन्वये वनांमधील जमिनी शेतकऱ्यांना दिलेल्या असल्यास त्याबाबतचे 8-अ प्रमाणपत्र मिळत नसल्याने अशा शेतकऱ्यांकडून नमुना 8-अ ऐवजी त्या शेतकऱ्यांचे वन हक्क अधिनियम 2005 नुसार वनांमधील त्यांच्या जमिनीचे धारण क्षेत्र निश्चित करण्यात आलेल्या शासकीय कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे वन हक्क जमीन धारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यास परवानगी मिळालेली आहे.
तसेच मतदार संघातील कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यातील मागील अनेक वर्षापासून बंद असलेले 8 शासकीय धान्य खरेदी केंद्र सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. आमदार कृष्णाजी गजबे यांनी पाठपुरावा केल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आरमोरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बंधूंनी त्यांचे आभार व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!