Home Breaking News पवनीतील तरुणाचा नागपुरात अवयवदानाचा आदर्श लिव्हर व दोन किडनी दानातून अनेकांना जीवनदान

पवनीतील तरुणाचा नागपुरात अवयवदानाचा आदर्श लिव्हर व दोन किडनी दानातून अनेकांना जीवनदान

178

पवनीतील तरुणाचा नागपुरात अवयवदानाचा आदर्श
लिव्हर व दोन किडनी दानातून अनेकांना जीवनदान

कार्यकारी संपादक दिनेश मंडपे

नागपूर:
गौरव शेंडे (वय २६ वर्षे), व्यवसाय – हेअर सलून, यांचे मूळ गाव पवनी असून त्यांच्या कुटुंबात आई रेखा शेंडे (वय ४३) आणि भाऊ सचिन शेंडे (वय २५) असा लहान परिवार आहे. गौरव व सचिन हे दोन्ही भाऊ स्वतःच्या सलूनमध्ये काम करत होते. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच निधन पावले होते.
शुक्रवार, दिनांक १६-०१-२०२६ रोजी गौरव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते सलूनमध्ये गेले नाहीत. सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे रेफर करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर सलग चार दिवस त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. सर्व आवश्यक तपासण्या व उपचार करूनही त्यांच्या मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती न्यूरोलॉजिकल दृष्ट्या अत्यंत खालावली. डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने आवश्यक सर्व वैद्यकीय निकष पूर्ण करून त्यांना मेंदूमृत घोषित केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुमित चाहाकर व शाम पंजाला यांनी कुटुंबीयांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली तसेच अवयव दानाबाबत समुपदेशन केले. यावेळी आई रेखा शेंडे, भाऊ सचिन शेंडे, मामा संदीप सूर्यवंशी व इतर कुटुंबीयांनी एकत्रितपणे सकारात्मक निर्णय घेत गौरव यांच्या अवयव दानास संमती दिली.
कुटुंबीयांनी गौरव यांचे लिव्हर व दोन्ही किडनी दान करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर सदर माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीस कळविण्यात आली. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे ट्रान्सप्लांट समन्वयक दिनेश मंडपे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करून प्रतीक्षा यादीच्या आधारे अवयवांचे योग्य वाटप केले.

Don`t copy text!