Homeगडचिरोलीविकासकामावर गाजली गडचिरोली नगरपरिषदेची सभा

विकासकामावर गाजली गडचिरोली नगरपरिषदेची सभा

नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली: येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार ११ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष यांच्या दालनात ऑनलाइन व ऑफलाइन पार पडली. सभेत २०२०-२१ च्या आर्थिक नियोजन तसेच शहरविकासाच्या ७२ मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
सभेत नगरपरिषद क्षेत्रातील लांजेडा व स्नेहनगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार ओपन पेसवर पाच लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत गडचिरोली शहराला ‘ओडीएफ’ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये माझी वसुंधरा अभियान राबविण्याबाबत प्राप्त शासननिर्णयानुसार नगरपरिषदेत अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. नगरपरिषदेकडून दलित वस्तीसाठी वाढीव विद्युत खांबसाठी ५४ लाखांचा निधी महावितरण विभागाकडे पाठविलेला आहे. विसापूर, सुभाषवॉर्ड, नेहरू वॉर्ड, गांधी वॉर्ड, लांजेडा, इंदिरानगर, रामनगर या वस्त्यांमध्ये गरजू लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची निविदा डीपीआर शासनाकडे पाठविला आहे. गडचिरोली शहरात नगरपरिषदच्या वतीने गोकुलनगर, शाहूनगर, फुलवॉर्ड येथील सुधारित अतिक्रमीत जागेचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आला. शहरातील ११ वर्षापूर्वी राहत असलेल्या झोपडपट्टी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातंर्गत वैशिष्ट्यपूर्ण नगरोत्थान, दलितवस्ती, दलितेस्तर, प्रस्ताव व अनुदान आदी अनुदानामधून गडचिरोली शहरातील व संकुल परिसरातील सिमेंट रस्ते, डांबरीकरणाचे रस्ते, सिमेंट नाली बांधकामाच्या प्रस्तावाला सन २०१९-२० व २०२०-२१ वर्षामध्ये १५ कोटीची मंजुरी देण्यात आली. सुभाषवॉर्ड येथील आठवडी बाजाराला संत जगनाडे महाराज नाव देण्याचे सभेत मंजुर करण्यात आले. तसेच चंद्रपूर मार्गावरील गणेशनगरला गणेशनगर नाव देण्यात आले. गोकुलनगर येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा इमारतीत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सदर शाळेच्या पटांगणात नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम एयूएचएम अंतर्गत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हरितपट्टा, वृक्षारोपण, वृक्षजतन, संवर्धन आदीबाबत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सभेला नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर, वित्त व नियोजन सभापती नीता उंदीरवाडे, पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम, शिक्षण सभापती रितू कोलते, नगरसेवक सतीश विधाते, रमेश चौधरी, भुपेश कुळमेथे, प्रशांत खोब्रागडे, रमेश भुरसे, वर्षा नैताम, प्रवीण वाघरे, गुलाब मडावी, अनिता विश्रोजवार, मंजुषा आखाडे, मुक्तेश्वर काटवे, गीता पोटावी, रंजना गेडाम, संजय मेश्राम, पुजा बोबाटे, वर्षा बट्टे आदी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!