अखेर कधी होणार दीना नदीवर पूल?देवदा व रेगडी परिसरातील नागरिकांचा प्रश्न…

0
691

जिल्हा संपादक प्रशांत शाहा

गडचिरोली: जिल्ह्यातील चामोर्शी, एटापल्ली व मूलचेरा अशा तीन तालुक्याला जुळणारा मुख्य व कमी अंतराचा मार्ग असलेल्या रेगडी देवदा या मार्गावर दीना नदी आहे. दिवस-रात्र या मार्गावर रहदारी असते. एटापल्ली तालुक्यातील नागरिक जिल्हा मुख्यालयी जाण्याकरिता जवळचा मार्ग म्हणून याच मार्गाचा वापर करतात.
या नदीवर पावसाळ्यात अनेक दुर्घटना पण घडले आहेत.
परंतु भारत देश स्वतंत्र होऊन 73 वर्ष लोटूनही अजून पर्यंत कोणत्याच महान नेत्याचे व अधिकाऱ्याचे या पूलाचे बांधकाम करण्याकरिता का लक्ष जात नाही. असा प्रश्न रेगडी,देवदा, बोलेपल्ली,गेदा,गट्टा, मोरखंडी,पोतेपल्ली, माडे आमगाव,विकासपल्ली अशा अनेक गावकऱ्यांकडून प्रश्न निर्माण केल्या जात आहे.
या नदीवर पूल झाल्यास मूलचेरा,एटापल्ली,चामोर्शी हे तीन तालुका जुळल्या जाणार व परिसरातील अनेक गाव सुधारित होणार बसेस ची पण सेवा सुरू होणार हे नक्की.
तरी शासनानी या पुलाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या पूलाचे बांधकाम करावे अशी मागणी भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शाहा,रेगडीचे मा.सरपंच बाजीराव गावडे,रमेश दयालवार,बाजीराव तलांडे,समाज सेवक प्रशांतभाऊ शाहा,आकाश कुलमेथे, उमेश मल्लिक,मुरलीधर रॉय,प्रकाश शाहा,साईनाथ गावडे व आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here