-सकाळचे पोंभुर्णा तालुका बातमीदार जवाहरलाल धोडरे(वय 45) यांचे आज (रविवारी) र्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. . जवाहरलाल धोडरे यांच्या निधनामुळे सामान्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शासन, प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्न, सर्वसामान्य व हातावर पोट असणार्या कामगारांच्या प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे ते पोंभुर्णा तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल. विविध संस्था व संघटनांनी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ, बहिणी, आंधळी पत्नी, एकमुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे तालुका घरातून, पत्रकारितेमधून आणि समाज बांधवांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एक सच्चा प्रामाणिक पत्रकार हरपला. अभ्यासू, सरळ आणि सच्चा पत्रकार आपल्यातून निघून गेला. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे.
जवाहरलाल धोडरे हे अभ्यासू अन इतरांपेक्षा वेगळे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. हे अकाली संकट झेलण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांस धक्कादायक, दुःखद घटना… पत्रकार जवाहरलाल धोडरे यांच्या निधनाने एक उमदा, अभ्यासू पत्रकार काळाने हिरावून नेला आहे .धोडरे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे . त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे . धोडरे कुटुंबातील कर्ता माणूस अकाली गेल्याने घर उघडे पडले आहे. सकाळ वृत्तपत्र समूहाने धोडरे कुटुंबाला भरीव आर्थिक मदत केली पाहिजे ही खरी श्रद्धांजली ठरेल.
-पत्रकार जीवनदास गेडाम
इंडिया दस्तक टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली…💐💐