Homeगडचिरोलीधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…

धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…

 

जिल्हा प्रतिनिधी / १९ नोव्हेम्बर
मुंबई/नागपूर/चंद्रपूर/गडचिरोली : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दि.१९ नोव्हेम्बरला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या १८०० रुपये हमीभावात थेट ७०० रुपयांचे अतिरिक्त बोनस जाहीर करीत आता थेट २५०० रुपये दराने धान खरेदी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज दिली .
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातिल काही भागात धानाचे पीक घेतल्या जात असून यावर्षी चांगले पीक होणार असे दिसत असतानाच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी मुळे आलेली पूरपरिस्थिती तसेच परतीच्या पावसाने शेतकरयांचे अतोनात नुकसान झाले . पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तथा वर्धा या पाचही जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असून वर्षाकाठी हा एकमेव्य पीक या जिल्ह्यामध्ये घेण्यात येत असल्याने यावर शेतकऱ्यांची आर्थिक घडी अवलंबून आहे.या जिल्ह्यामध्ये विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यात यंदा धान पिकावर अतिवृष्टी, पूरस्थिती आणि रोगराई या नैसर्गिक आपत्ती मूळे धान उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला . येथील विदारक परिस्थितीची पाहणी विजय वडेट्टीवार यांनी स्वतः शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन पाहणी केली आणि स्वतः च्या विभागाकडून मदत सुध्या जाहीर केली. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य सरकारने पत्र पाठविले असता थेट केंद्रीय पथकही येऊन गेले मात्र केंद्राकडून अद्याप ठोस अशी भरीव मदत मिळालेली नाही . एकंदरीत ही परिस्थिती बघता ना. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभाव वाढवून देण्यासाठी मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव ठेवला . त्यानुसार आज महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ७०० रुपयांचे बोनस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . मागिल वर्षी असलेल्या १८०० रुपयांचे हमीभाव कायम असले तरी त्यात ७०० रुपये बोनस ची भर पडल्याने आता शेतकऱ्यांकडील धान खरेदी ही २५०० रुपये दराने होणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय ठरला असल्याचे मत ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!