चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार,उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्री इथे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची झाली सकारात्मक चर्चा
अकोला, परभणी आणि चंद्रपूर इथे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकमेकांना देणार साथ
मुख्य संपादक इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल 9767787977
मुंबई, दि. २७ – चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर व्हावा यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्री इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याची सकारात्मक चर्चा झाली.
चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ आणि वंचितच २ नगरसेवक यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री इथे दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिट झालेल्या चर्चेत शिवसेना पक्षाकडून अडीच वर्ष महापौर आणि स्थायी समिती पदाची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडून काँग्रेस बरोबर पुढील चर्चेची जबाबदारी खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांना देण्यात आली आहे.मातोश्री इथे झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन मातोश्री येथील भेटीचा तपशील दिला.
चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर व्हावा ,हे माझे प्राधान्य आहे. अकोला आणि परभणी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला काँग्रेसची मदत लागणार आहे तसेच चंद्रपुरात काँग्रेसला शिवसेना पक्षाच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. याबाबत चर्चा होऊन लवकरच तोडगा निघेल.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील मातोश्रीबरोबर चर्चा करतील अस काँग्रेस विधिमंडळनेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचा गट संपर्कात असल्याचा दावा केला. हा दावा म्हणजे तोंडाच्या वाफा काढणे आहे.भाजपकडे महापौर बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही भाजपचे नेते फक्त मोठ्या बाता मारत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.







