समुद्रपुर तालुक्यातील विविध ग्रामीण भागात आदिवासी बांधवातर्फे बिरसा मुंडा जयंती साजरी

589

निलेश. कोयचाडे
ता. समुद्रपुर. ग्रामीण प्रतिनिधी

आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत असलेले आदिवासी जणनायक,धरती आबा,क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १४५ जयंती निमित्त समस्त आदिवासी बांधवांनी आप आपल्या गावामध्ये त्याना विनम्र अभिवादन केले त्याच बरोबर त्याच्या प्रतिमेला माल्या अर्पण करुन त्याच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले….

कुठे संघटनानी तर काही गावातील आदिवासी बांधवाणी सम्पूर्ण एक निश्चितच पणे कार्य कर्म आदिवासी बांधवानी पार पाडला..

समुद्रपुर तालुक्यातील आदिवासी समता परिषद – धामणगाव .
हरणखुरी,हमदापुर,वाघेडा,राळेगाव,सुलतानपुर (मजरा) या गावातील सम्पूर्ण आदिवासी बांधवान तर्फे १४५ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी सम्पूर्ण कोविडं च्या नियमाचे सुध्दा पालन करण्यात आले..या वेळी अनेकानी बिरसा मुंडा त्याच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकला
उपस्थित नागरिकाना मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध मान्यवरांची भाषणे सुध्दा झाली…..