Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकी करिता अधिसूचना प्रसिद्ध

गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकी करिता अधिसूचना प्रसिद्ध

सतीश कुसराम.

गडचिरोली,दि.17:-गडचिरोली जिल्हयातील मौजा धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी , भामरागड व सिरोंचा या नगर पंचायतीच्या सन 2020 मध्ये होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणूकासाठी नगर पंचयात क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे त्यामधील स्त्रियांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करण्याचे ठरवीत आहे. याबाबतची अधिसूचना व आदेशाचा मसुदा जनतेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच सर्व नगर पंचायत व तहसिल कार्यालयाच्या सुचना फलकावर दिनांक 18 नोव्हेंबर, 2020 (बुधवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येत आहे.

हि अधिसुचना गडचिरोली जिल्हयातील नगर पंचायत , धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी, भामरागड, व सिरोंचा क्षेत्रातील सर्व रहीवाश्यांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत असून आदेशाच्या मसुद्यावर दिनांक 18 नोव्हेंबर, 2020 (बुधवार) ते 26 नोव्हेबर, 2020 (गुरुवार) पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सुचना मागविण्यात येत आहेत. उक्त आदेशाच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती / सुचना असतील त्यांनी त्या पुराव्यासह संबधित उप जिल्हाधिकारी / उप विभागीय अधिकारी / मुख्याधिकारी यांचेकडे दिनांक 26 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार) रोजी किंवा तत्पुर्वी कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती / सुचना विचारात घेण्यात येणार नाही. विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी दिनांक 10 डिसेंबर, 2020 पर्यंत घेण्यात येईल. यांची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!