प्रतिनिधी /प्रमोद दुर्गे गोंडपीपरी:-
जीवन प्राधिकरण केंद्र चंद्रपूर अंतर्गत गोंडपीपरी तालुक्यातील सुरगाव येथे जलशुद्धीकरनाचे बांधकाम सुरू आहे.
कोरोनामुळे सर्व काम -धंदे बंद झाल्याने कित्येकाचे संसार उघड्यावर पडू नये या कुणीही उपाशी राहू नये या करिता समाजातील दानसुर,व सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘किट’ देऊन कोरोना संकटात मदत केली
असे असतानाच कोरोनाचा प्रभाव ओसुरु लागल्याने बरेच मजूर,कामगार मिळेल त्या कामावर जाऊ लागले,
त्यामळे
गोंडपीपरी तालुक्यातील सुरगाव येथिल बांधकामावर स्थानिक तसेच इतर जिल्ह्यासह चंद्रपूर तालुक्यातील मजूर मुक्कामास राहून काम करीत आहेत. ऐन
दिवाळीच्या सण तोंडावर असतानाच संबधीत ठेकेदाराने कामगारांना मजुरी देण्यास टाळाटाळ करीत होते.
सदर बाब युवा स्वाभिमानी पक्षाच्या तालुका अध्यक्ष नागेश ईटेकर याना माहिती झाल्याने त्यांनी सदर कामाच्या ठिकाणी जाऊन कामगाराशी संवाद साधून विचारपूस केली असता ठेकेदार मजुरी देण्यास टाळाटाळ करीत आहेत अशी माहिती मजुरांनी सांगितली.
लगेच ठेकेदाराला भ्रमणध्वनी वर संवाद साधला
व त्यांना धारेवर घेऊन कामगारांच्या मजुरीचा ज्वलंत प्रश्न सोडविन्याची मागणी रेटून धरली व कामगारांना त्वरित मजुरी देण्याची मागणी केली आणि मजुरीचा प्रश्न लवकर सुटला पाहिजे अन्यथा आम्ही कार्यवाहीचा बळगा उभारू अशी टोकाची भूमिका घेत आंदोलन करण्याचा इशाराही दिला असता सदर बाब लक्षात घेऊन संबधीत ठेकेदारांनी तळजोड करून
अखेर कामगारांची मजुरी देण्यास तयार झाले आज सर्व मजुरांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळाला .
Advertisements
युवा स्वाभिमानी पक्षाच्या तालुका अध्यक्ष नागेश ईटेकर यांच्या पुढाकाराने सुटला मजुराचा प्रश्न
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements