Advertisements
Home नागपूर पदवीधर मतदार संघ, नागपूर मधून अँड. अभिजित वंजारी यांनी महाविकास आघाडीतर्फे दाखल...

पदवीधर मतदार संघ, नागपूर मधून अँड. अभिजित वंजारी यांनी महाविकास आघाडीतर्फे दाखल केला अर्ज…

नागपूर:- येत्या एक डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस तर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी महा विकास आघाडीतर्फे गुरुवारी एडवोकेट अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

Advertisements

भाजपकडे असलेला हा मतदारसंघ यावेळी जिंकण्यात नक्कीच यश मिळेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वंजारी यांनी समर्थकांसह दाखल होत उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे महासचिव किशोर गजभिये, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेस नेते नाना गावंडे, डॉ. बबनराव तायवाडे, सरचिटणीस मुन्ना ओझा, प्रवक्ते राहुल लोंढे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढविणार असल्याचे सूतोवाच केले असले तरी वंजारी हे महा विकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नक्कीच सोबत राहील असा दावा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. काँग्रेसने पूर्ण रणनीती आखून मैदानात उतरली असून भाजपच्या चक्रव्यूह तोडला जाईल असा दावा त्यांनी केला.
रोजगार आणि स्वयंरोजगार यासारख्या अनेक प्रश्नांनी पदवीधर त्रस्त आहेत. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्‍यक आराखडा तयार करून तो सरकार दरबारी मांडून त्यावर उपाय योजले याला आपले प्राधान्य राहील असे म्हटले एड. अभिजित वंजारी यांनी म्हटले…

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील शिक्षकाकडूनच अवयवदान

नागपूर: उद्याचे आदर्श नागरिक घडवित असताना एका शिक्षकाने मरणानंतरही अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. सुरुवातीला करोना व त्यानंतर विविध कारणाने मूत्रपिंड उपलब्ध न झाल्याने वणीतील...

‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे पुस्तक मलेशिया येथे प्रकाशित होणार

नागपूर : 'वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा' हे जयंत साठे लिखित समीक्षणात्मक पुस्तक असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तीन फेब्रुवारी 2023 रोजी मलेशिया येथील आंबेडकरवादी...

प्रचंड मेहनत हेच यशाचे सूत्र – श्री लीलाधर पाटील 

दिनेश मंडपे कार्यकारी संपादक नागपुर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत मा. धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी पुणे) यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली...

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

बळीराम काळे जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही...

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!