शेतात गेलेल्या इसमाचा विजेच्या धक्काने दुर्दैवी मृत्यु…

0
1952
Advertisements

गोंडपीपरी:- आज सकाळी शेत शिवारात कामानिमित्त गेलेल्या इसमाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्य झाला. गोजोली येथील मामा तलावाच्या जवळ असलेल्या श्री अशोक मेश्राम यांच्या शेतात विजेच्या धक्क्याने गोजोली येशील श्री साईनाथ दाऊ मेश्राम वय (४३वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
साईनाथ हा घरातील प्रमुख व्यक्ती असल्याने त्याच्या अश्या अकाली मृत्यूमुळे घरातील खांदा गेला आहे. आधीच मोठया भावाच्या मृत्यूने अधीर झालेल्या कुटुंबाला आता साईनाथ च्या मृत्यूने हादराच बसलेला आहे.

या घटनेने कुटुंबातील पाच व्यक्तीचे आधारस्तंभ असलेला साईनाथ गेल्याने सर्व गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार असून, परिवारावर संकट कोसळले आहे…
घटना स्थळी वीज वितरण कंपनी चे कर्मचारी श्री विशाल अमराज व वन विभागाकडून वनरक्षक एस एस नैताम व पोलीस विभागाकडून तपास अधिकारी श्री अनिल चांदोरे पोलीस उप निरीक्षक हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here