Homeचंद्रपूरगोंडपिंपरीनितीनभाऊ मेश्राम यांनी शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला वाढदिवस

नितीनभाऊ मेश्राम यांनी शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला वाढदिवस

प्रमोद दुर्गे:-

गोंडपीपरी राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्याध्यक्ष नितीनभाऊ मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उंदिरंगाव येथील शिल्पा वाकुडकर ने सुरू केलेल्या ज्ञान शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व ज्ञान शाळेतच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. हल्ली
वाढदिवस म्हटलं की,मित्रमंडळी व आप्तजनाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत असतोच!मग
ओली वा सुखी पार्टी ठरलेली असतेच! ह्या साऱ्या गोष्टी बाजूला सारून समाजाचे काही देणं लागत ,ह्या भावनेतून
गोंडपीपरी तालुक्यातील नवेगाव येथील तालुका राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्याध्यक्ष नितीनजी मेश्राम यांनी वाढदिवस दिनी अनावश्यक व व्यर्थ खर्चाला फाटा देत उंदिरंगाव येथिल शिल्पा वाकुडकर या युवतीने कोरोना संकटाने सर्व शाळा , कॉलेज बंद असताना आपल्या घरीच ज्ञान शाळा सुरू करून ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू केले
त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वितरण करण्यात आले व आनंदमय वातावरण असलेल्या ज्ञान शाळेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!