आमदार सुभाष धोटे यांची पत्रकारपरीषद…

0
248

गोंडपिपरी:-(सुरज माडुरवार)

Advertisements

राजुरा विधानसभेचे आमदार यांनी गोंडपिपरी तालुक्यासाठी विविध विकास योजनांना मंजुरी मिळवून घेतली आहे.गोंडपिपरी येथे प्रशासकीय ईमारत बांधकामासाठी १५ कोटी रु निधी मंजूर केला आहे.शहराच्या वळण रस्त्याकरिता २ कोटी ५० लाख ,परसोडी ते आर्वी गावात पेविंग ब्लागच्या कामाकरिता ८० लाख प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ५ कोटी ५० लाख निधी मंजूर केला असून या अंतर्गत धामनगाव ते अडेगाव रस्त्यासाठी १ कोटी ११ लाख,व्यंकटपुर ते धानापूर २ कोटी २३ लाख,सुकवासी पोचमार्गावर पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ६२ लाख.एफ आर डी योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुरुस्ती साठी ५ कोटी ५० लाख गोंडपीपरी येथील तलाव सौंदर्यी करण्यासाठी ८१ लाख.आमदार निधीअंतर्गत स्वर्गरथ वाहनासाठी १३ लाख देण्यात आले.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अग्निशामक वाहनासाठी ८५ लाख,पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपंचायत ला १८३ घरकुलसाठी १ कोटी ८३ लाख मंजूर करण्यात आले.ठक्कर बाबा योजनेअंतर्गत २७ लाख मंजूर,प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत १ कोटी ६९ लाख,ग्राम विकास निधी अंतर्गत १ कोटी ४५ लाख,वसंतराव नाईक तांडा वस्थी सुधार योजनेतून २९ लाख,गोंडपीपरी नगरपंचायत ला रस्ता अनुदान योजनेअंतर्गत २२ लाख,सहाय्य योजनेअंतर्गत १ कोटी ५० लाख.नगरपालिकेला वैशिटीपूर्ण कामांसाठी ८५ लाख निधी.दलित सुधार योजनेअंतर्गत १७ लाख निधी मंजूर केला आहे.याच्यासह अनेक विकास कामांना मंजुरी मिळवून निधी उपलब्ध केला असून गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाठी सदैव तत्पर असल्याचे आमदार धोटेनि पत्रकार परिषदेत विकास कामांची माहिती दिली.यावेळी राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्ष सपना साखलवार,बाजारसमितीचे सभापती सुरेश चौधरी,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,अशोक रेचनकर,देवीदास सातपुते,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष विनोद नागापुरे,नामदेव सांगळे,देवेंद्र बट्टे,अभय शेंडे,ऋषी धोडरे,महिंद्र कुणघटकर,शम्भूजी येलेकर,संतोष बंडावार ,विलास कोहपरे,रफिक शेख, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here