Homeचंद्रपूरकोरपनादालमिया सिमेंट येथील जुन्या कामगारांना न्याय मिळवून देणार - आ. सुभाष धोटे

दालमिया सिमेंट येथील जुन्या कामगारांना न्याय मिळवून देणार – आ. सुभाष धोटे

 

कामगार संघटनेची करणार स्थापना

कोरपना – तालुक्यातील मुरली ऍग्रो सिमेंट कंपनी व नव्या दालमिया सिमेंट येथे नवीन व जुने कामगार असा संघर्ष सुरू असून हा संघर्ष मिटविण्यासाठी व परिसरातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार संघटनेची स्थापन करण्याची घोषणा आमदार सुभाष धोटे यांनी आज दालमिया सिमेंट गेटवर घेण्यात आलेल्या कामगारांच्या सभेत केली.
मुरली सिमेंटच्या पाया उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जुन्या ३०५ कामगारांना व असंघटित कामगार म्हणून काम करीत असलेल्या जुन्या कामगारांना कामावर घेतल्यानंतर सिमेंट कंपनीमध्ये उर्वरित शिल्लक जागांकरिता स्थानिक कामगारांना व युवकांना संधी देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित कामगारांचा समोर म्हटले. कामगार संघटना स्थापन करण्याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा अनुकूलता दर्शविली असून लवकरच कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता संघटनेची स्थापना करून कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सुभाष धोटे यांनी म्हटले.
यावेळी मंचावर इंटकचे दास, पंचायत समिती सभापती रूपाली तोडासे, उपसभापती सिंधूताई आस्वले, माजी सभापती श्‍याम रणदिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, राजुरा पंचायत समिती सदस्य रामदास पुसाम, बिबीचे उपसरपंच आशिष देरकर, राजाबाबू गलगट, गडचांदूर नगर परिषदेचे गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव मिलिंद ताकसांडे, प्रकाश मोहुर्ले, आशिष वांढरे यांच्यासह नारंडा, वनोजा, कढोली, अंतरगाव, वनसडी व परिसरातील गावातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी केले तर प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य रामदास पुसाम यांनी केले. आभार आशिष वांढरे यांनी मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!