आमदार सुभाष धोटेंच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

0
250

 

कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध-आमदार सुभाष धोटे.

Advertisements

राजुरा (ता.प्र) :– काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेतृत्व तळागाळातील लोकांपर्यंत शाश्वत विकास पोहचविणारा आहे. अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षात आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन नव्याने पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व सन्मानीय कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आणि आपला पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी द्वारा राजुरा विधानसभा विधानसभा काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रम आणि संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य योजनेच्या नवनिर्वाचीत अध्यक्ष, सदस्य यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
या प्रसंगी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षातील शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यात विहिरगावचे माजी सरपंच तथा भाजपचे नेते रामभाऊ देवईकर, भाजपचे मनोहर धुडसे, मारोती वनकर, वसंता आसमपल्लीवार, अरुण रागिट, शुभम वाघमारे, सिंधीचे दिनकर मोरे, बामनवाडाचे वैभव पावडे, गोयेगावचे बंडू घुगुल, चुनाळा येथील शिवसेनेचे केशव वांढरे, मारोती निवलकर, रमेश मायकुलकर, भास्कर परशुटकर, नरेश पानसे, श्रीनिवास सारडा, मानिक कुंभे, श्रीकांत दुवाशी, सातरीचे उपसरपंच मारोती मोरे, माजी कृ उ बा स संचालक संजय मून, माजी सरपंच मनजित वाघमारे, सुनील पोतले यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचा दुप्पट देवून सन्मानासह पक्ष प्रवेश देण्यात आला.
या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, सदस्य विकास देवाडकर, कवडु सातपुते, अफसर भाई, कोमल पुसाटे, भाग्यश्री आत्राम, प्रभारी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अशोक राव यासह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, जेष्ठ नेते हमीदभाई, अशोकराव देशपांडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष तथा नवनियुक्त प्रभारी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, प.स. सदस्य तुकाराम माणूसमारे, न.प सदस्य हरजित सिंग संधु, कृ.उ.बा.स संचालक अविनाश जेणेकर, काँग्रेसचे कार्याअध्यक्ष नंदकिशोर वाढई, देवाळाचे उपसरपंच जावेद अब्दुल, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, धोपटाळाचे सरपंच राजु पिंपळशेंडे, माजी सरपंच राजाराम येल्ला, संगीता हिवराळे, जंगीतवार, धनराज चिंचोलकर, माथराचे सरपंच लहू चहारे, वसंत ताजने, दिपक वांढरे, निलकंठ खेडेकर, रविकांत होरे, उपसरपंच ईरशाद शेख, भाऊराव आकनूरवार, संतोष इंदुरवार, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा कविता उपरे, माजी सभापती निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, शिला टाले, कवयित्री संगीता धोटे, साखरीचे उपसरपंच अमोल घटे, राजकुमार ठाकूर, यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी कृ. उ. बा. समितीचे संचालक रंजन लांडे यांनी केले, संचालन युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here