बिबट्याने हल्ला करून ठार मारलेल्या महिलेच्या कुटुंबास राज्यशासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी ; आमदार डॉ देवराव होळी

0
569

गडचिरोली जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

Advertisements

चामोर्शी तालुक्यातील घोट जवळील ठाकूरनगर येथे आज पहाटे येथील माया जगदीश हलदार वय ( 56) ही महिला घराच्या सांधवाडीत शौचा करिता गेली असता बिबट्याने हल्ला करून बांबूचे कंपाऊंड तोडून खरफटकत नेऊन ठार मारले
व आरडाओरड केल्याने
बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला यामुळे गावात शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सर्वप्रथम ग्रामीण रूग्णालय येथील पोस्ट मॉर्तम गृहास भेट दिली यावेळी डॉ आय ,जी नागदेवते ,डॉ, दोरखंडे उपस्थित होते व कुटुंबीय यांना सांत्वन केले व लगेचच मृतक यांचे रहिवाशी गाव ठाकूर नगर येथे घोट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सोबत घेऊन भेट दिली व स्वतः आणि वन विभागाच्या वतीने मृताकाच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले यावेळी गावात शोककळा पसरली होती गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी बिबट्याने हल्ला करून ठार केलेल्या महिलेच्या कुटुंबास राज्यशासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली व आमदार डॉ होळी यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली व वनविभागाच्या व राज्य सरकारच्या वतीने कुटुंबीयास तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा येथील भाजपा पदाधिकारी विमल सेन,विकास मैत्र,दिलीप हलदर,अम्लीन्दू विस्वास,प्रदीप मंडल व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here