सुरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच उभारून उत्खनन तातडीने सुरू करा

0
283

खास. अशोक नेते यांची महामहिम राज्यपालांकडे मागणी

गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड ता. एटापल्ली येथे उच्च दर्जाचे लोह खनिज मोठया प्रमाणात आहे 50 वर्षापर्यंत पुरेल एवढे लोहखनिज त्याठिकाणी आहे त्यामुळे लोहखनिज प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाल्यास हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल व ते आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. येथील आदिवासी बांधवांची मागणी व दुर्गम भागाचा विकास होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते मा श्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकल्पाला मंजुरी दिली व लोह उत्खनन करण्यासाठी लायड्स मेटल कंपनीला लिजवर उत्खननाची परवानगी दिली तसेच प्रकल्प उभारण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील जागेची निवडही करण्यात आली. तदनंतर सदर कंपनीने लोह उत्खनन सुरूही केले मात्र नक्षलवाद्यांच्या विध्वंसक कारवायामुळे काम बंद पडले असून प्रकल्प अधांतरीच आहे.

जिल्हावासीयांची मागणी, जिल्ह्याचा विकास व बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन खासदार अशोक नेते यांनी उत्खनन पूर्ववत सुरू करून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी काल दि. 19 ऑक्टोबर रोजी राज्याचे महामहिम राज्यपाल मा श्री भगतसिंग जी कोशारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली व 2 वर्षपासून बंद असलेले उत्खनन पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रकल्पाला उचित पोलीस सुरक्षा पुरविण्याची व लोहखनिज प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातच सुरू करून हजारो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी महामहिम राज्यपालांकडे रेटून धरली व यासंदर्भात उचित निर्देश राज्य शासनास देण्याची विंनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here