Home गडचिरोली प्राणहिता नदीत बुडून एकाचा दुर्दवी मृत्यू

प्राणहिता नदीत बुडून एकाचा दुर्दवी मृत्यू

637

 

मूलचेरा प्रतिनिधी/रुपाली रामटेके

 

तेलंगणा व महाष्ट्रातील सीमेवरती असलेल्या प्राणहिता नदीत बुडून अर्जुन चंद्रा कोडापे वय वर्ष 25 राहणार येल्ला याचा दुर्दवी मृत्यू झाला आहे
मूलचेरा तालुक्यातील येल्ला या गावातील रहवासी मृत्यूक अर्जुन हा रोजगाराच्या कामाकरिता नदी पलीकडे असलेल्या तेलंगणा या राज्यात कामाकरिता जात होता दरम्यान तो नदीत आंघोळ करण्या करिता गेला असता त्याचा तोल जास्त पाण्यात गेल्याने तो वाहून गेला व त्यात त्याचा मृत झाला
काल सायंकाळच्या सुमारास घडली ही दुर्दैवी घटना
आज दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यूदेह आला आढळून
अर्जुनच्या मृत्यूमुळे येल्ला गावात शोककळा पसरलेला आहे
घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली असता तेलंगणा राज्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्याचे प्रेत शवविच्छेदना करिता पाठवण्यात आले आहे
पुढील तपास तेलंगणा पोलीस करीत आहे

Don`t copy text!