Advertisements
Home गडचिरोली राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठवाडातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर

राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठवाडातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर

शेतकार्यासोबत थेट संवाद साधून अडीअडचणी जाणल्या

Advertisements

वडेट्टीवार यांनी लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करून सविस्तर माहिती घेतली

*पूरग्रस्तांना भरीव मदत देणार.. विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन*

नांदेड/मुंबई/नागपूर/ चंद्रपूर

गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात जोरदार पाऊस झाला आहे. या पुरामुळे अनेक जण वाहून गेले असून शेतकऱ्याचे उभे पीक उध्वस्त झाले. आशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ह्यांनी आज सकाळ पासूनच नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा सुरू केला.
नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी सह अधिकाऱ्याकडून पुराची व झालेल्या नुकसानी बाबतची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली. त्यानंतर थेट तुपा गावातील पूरग्रस्त भागाची थेट जागेवर जाऊन पाहणी केली. शेतकार्यासोबत थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी वडेट्टीवार यांनी जाणून घेतल्या.
याप्रसंगी शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यात येणार असून शासन कटीबद्ध आहे. असे आश्वासन विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांनी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे थेट जागेवर जाऊन करावे, यात कोणीही सुटता काम नये, पंचनामा करतांना वस्तुस्थितीला धरून व पूरग्रस्तांना विश्वासात घेऊन पंचनामे करून शासनाला तातडीने अहवाल सादर करावे जेणेकरून पूरग्रस्तांना तातडीने भरीव मदत देत येईल असे निर्देश त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे शेतातील पिके पूर्णतः उध्वस्त झाले असून शेतकऱ्याचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्यामुळे त्यांना तातडीने भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी करणारे लेखी निवेदन आमदार अमर राजूरकर, आम हंबर्डे, आम बालाजी कल्याणकर, माजी आम डी पी सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधीनी मंत्री विजय वडेट्टीवार याना दिले.
मंत्री वडेट्टीवार हे आज पासून सलग चार दिवस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा…घराघरावर तिरंगा लावुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया-खा.अशोकजी नेते

नितेश खडसे (जिल्हा संपादक, गडचिरोली) गडचिरोली: स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य बाईक रॅलीचे कारगिल चौक गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले.हि बाईक रॅली या...

गडचिरोली पोलीस दलाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली - जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या कार्याची दखल घेऊन नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयएसीपी', व्हर्जिनीया युनिव्हर्सिटी (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलिस)चा लीडरशिप इन...

घरोघरी तिरंगा हा कार्यक्रम फक्त भाजपचाच नसुन भारत देशावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण नागरिकांचा आहे- खा. अशोक नेते…#७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली...

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा संपादक) गडचिरोली- देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी थोर महात्मे,करांतीकारी यांनी आपले बलिदान देवुन देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले.स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष पूर्ण होत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा…घराघरावर तिरंगा लावुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया-खा.अशोकजी नेते

नितेश खडसे (जिल्हा संपादक, गडचिरोली) गडचिरोली: स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य बाईक रॅलीचे कारगिल चौक गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले.हि बाईक रॅली या...

चंद्रपूर महानगर पालिकेच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह? चंद्रपुर शहरातील घनकचरा रस्त्यावर…

श्याम म्हशाखेत्री जिल्हा संपादक, चंद्रपुर चंद्रपुर: चंद्रपुर महानगरपालिका तर्फे घनकचरा व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने केल्या जात असल्याने सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंद्रपुर शहरातील...

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातात निधन…अनेक दशकापासून राजकारणात सक्रिय सहभाग…

नागपूर : चक्रधर मेश्राम दिनांक:-14/08/2022 Vinayak Mete terrible accident शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा दौरा…

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार* *श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि.१४ , व १५ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२* *सकाळी ८...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!