Homeगडचिरोलीरेमडीसेव्हीर इंजेक्शन खाजगी दवाखान्यातील रुग्णांना निश्चित दरात उपलब्ध

रेमडीसेव्हीर इंजेक्शन खाजगी दवाखान्यातील रुग्णांना निश्चित दरात उपलब्ध

 

गडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चंद्रपूरमधील औषधी विक्रेत्याची निवड

कोविड-19 रुग्णांना उपचारासाठी रेमडीसेव्हीर 100 मि.ग्र. इंजेक्शन औषध म्हणून वापरले जाते. *राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.* परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर येत होत्या. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित दरात रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध केले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात हे इंजेक्शन खाजगी औषधी केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातील खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी जनऔषधी मेडिकल स्टोअर्स रेड क्रॉस भवन, चंद्रपूर येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर इंजेक्शन खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी 2360 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सदर इंजेक्शन खेरदी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना संबंधित डॉक्टरच्या सहीने फॉर्म भरुन औषधी दुकानात सादर करावा लागणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!