Homeगडचिरोलीजिल्ह्यात दुकानांच्या वेळेमधील वाढीसह आठवडी बाजार भरविण्यास परवानगी

जिल्ह्यात दुकानांच्या वेळेमधील वाढीसह आठवडी बाजार भरविण्यास परवानगी

 

गडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम

कोरोना साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहान

19 साथरोग अंतर्गत जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात यापूर्वीचे लॉकडॉऊन आदेश अधिक्रमित करुन गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन वगळून अतिरिक्त सुधारित नियमावली आणि उपाययोजना दिनांक 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी परवानगी दिलेले व या आदेशाद्वारे अतिरिक्त परवानगी दिलेले बाबी वगळता इतर प्रतिबंधित बाबीमध्ये मोडणारे दुकाने, आस्थापना सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने नियमितपणे सर्व दिवस सकाळी 9 ते रात्रौ 9 पर्यंत सूरू ठेवण्याची मुभा असणार आहे. तथापि, सर्व दुकानामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असून एका वेळीस फक्त पाच ग्राहक आत असतील यांची अट पूर्वीप्रमाणेच असणार आहे. आज पासून पुढील उपक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्व व्यवस्थापनातंर्गत येत असलेले शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस हे दि. 31.10.2020 पर्यंत बंद असतील. तथापि ऑनलाईन/दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षणास मुभा असेल. 50 टक्के उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यंना शाळेत प्रत्यक्ष बोलावून ऑनलाईन/दूरस्थ/टेलिकॉऊन्सलिंग शिक्षणाबाबत कार्यवाही करता येईल. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्वांनी कार्यवाही करणे बंधनकारक असेल. कौशल्याधिरीत शैक्षणिक बाबी जसे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, आयटीआई, कौशल्य विकास कार्यक्रमांशी संलग्नित शॉर्ट टर्म ट्रेनिंग सेंटर्स इत्यादींना प्रशिक्षणाची अनुमती असेल. तथापि यांनी कोविड-19 साथरोगसंदर्भाने आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचना/निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
उच्च शिक्षणासंदर्भात ऑनलाईन/दूरस्थ शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यात यावे. तथापि विज्ञान व तंत्रज्ञान संदर्भात निर्धारित प्रयोगशाळेत प्रत्यक्षपणे प्रात्याक्षिक करणेस संबंधित वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर प्रात्यक्षिके अत्यंत अनिवार्य असल्याची खातरजमा केल्यानंतर आरोग्य विभागाचे कोविड-19 साथरोग संदर्भाने दिलेल्या सूचना/निर्देशांचे अधीन राहून सदर बाबींना अनुमती असेल. *सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालये सुरु ठेवण्याची मुभा असेल*. विवाह तसेच इतर घरगुती कार्यक्रमांना कमाल पन्नास लोकांच्या मर्यादेत परवानगी असेल तथापि सदर कार्यक्रमांना यापुढे संबंधित तहसिलदार यांचेकडून *परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.*
अंत्यसंस्काराच्या बाबतीत वीस पेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल. *सामाजिक अंतर राखून आठवडी बाजार भरविण्यास परवानगी असेल*. परराज्यातून या राज्यात/जिल्ह्यात रेल्वेद्वारा प्रवास करणाऱ्या व्यक्तींना रेल्वे स्टेशन वर शासन निर्देशाप्रमाणे स्टॅपिंग करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!