नवीन 117 कोरोना बाधित तर 103 कोरोनामुक्त

0
217
Advertisements

 

गडचिरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

जिल्हयात आज 117 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेच एकुण सक्रिय बाधितांमधील आज 103 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 977 झाला. आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4155 वर पोहचली आहे. यापैकी 3146 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. एकुण आत्तापर्यंत जिल्हयात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.72 टक्के आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 25.51 असून मृत्यूदर 0.77 टक्के आहे.

Advertisements

आज नवीन 117 बाधितांमध्ये गडचिरोली 48, अहेरी 6, आरमोरी 15, भामरागड 0, चामोर्शी 6, धानोरा 6, एटापल्ली 15, कोरची 02, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 5 व वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे. तसेच आजच्या 103 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 28, अहेरी 25, आरमोरी 10, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 4, एटापल्ली 15, मुलचेरा 0, सिरोंचा 3, कोरची 7, कुरखेडा 2 व वडसा येथील 6 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील 48 बाधितांमध्ये स्थानिक 3, मुरखळा 1, अयोध्यानगर 1, भगवती राईस मील येथील 4, कॅम्प एरिया 4, डोटकुली 1, दुर्गा माता मंदिर जवळ 2, गांधी वार्ड येथील 1, जीएनएम हॉस्टेल 1, गोकुल नगर 1, एसएसनेस्ट दुकानाच्या समोर 1, कन्ममवार वार्ड येथील 3, मेडिकल कॉलोनी 1, नवेगाव 3, पोर्ला येथील 2, पोटेगाव 1, रामनगर जवळ 2, रामपुरी वार्ड येथील 2, रविंद्र नगर 1, रेव्हेन्यु कॉलनी 1, साई अपार्टमेंट आशिर्वाद नगर येथील 2, सर्वेादय वार्ड येथील 3, सोनापुर कॉम्प्लेक्स 1, झेड पी कॉलोनी 1, इतर जिल्हयातील 5 जणांचा समावेश आहे.
अहेरी तालुक्यातील 6 बाधितामध्ये स्थानिक 3, अहेरी (प्राणहिता) 2, जिमलगट्टा 1 जणांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील 15 बाधितांमध्ये स्थानिक 11, विठ्ठल मंदिराजवळचे 2, ठाणेगांव 1, विद्यानगर 1, यांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील 6 बाधितांमध्ये ठाकरी 1, पोलीस स्टेशन जवळ 3, घोट 2 यांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील 6 बाधितामध्ये काटेझरी येथील 1, जपतलाई 1, पेंढरी येथील 3, येरकड येथील 1 जणांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील 15 बाधितामध्ये स्थानिक 9 जणांचा समावेश आहे. तर कोरची तालुक्यातील 2 बाधितातध्ये हितापल्ली 1, कोटगुल 1 जणांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील 10 बाधितामध्ये पुराडा येथील 8, कढोली येथील 1, येडापुर येथील 1 जणांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील 5 बाधितांमध्ये स्थानिक 5 जणांचा समावेश आहे. वडसा तालुक्यातील 10 बाधितांमध्ये चोप येथील 1, कन्मवार्ड येथील 1, किनहाडा येथील 2, कितवाई येथील 3, शंकरपूर 1, शिवाजी वार्ड येथील 2 जणांचा समावेश आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here